सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य हे अत्यंत चुकीचे:- आमदार अतुल बेनके
1 min read
जुन्नर दि.७:- देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे याचे कुणीही समर्थन करू शकत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो.असे आमदार अतुल बेनके यांनी म्हणत जाहीर निषेध व्यक्त केला.