आणे येथे महाविकास आघाडीची पदयात्रा; ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

1 min read

आणे दि.७:- महाविकास आघाडीचे जुन्नर तालुक्याचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारार्थ आणे पठार भागात आयोजित केलेल्या पदयात्रेस ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांच्या विक्रमी उपस्थितीमध्ये ही पदयात्रा पार पडली.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या विजयाचा निर्धार आणे पठार ग्रामस्थांनी केले होता आणि विक्रमी मतदान या भागातून महाविकास आघाडीला झाले.

विधानसभा निवडणुकीला पुन्हा एकदा ग्रामस्थांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन डॉ. अमोल कोल्हे व सत्यशील शेरकर यांनी केले.

ग्रामस्थांनी दाखवलेल्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, हे वचन देतो. ग्रामस्थांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत असे शेरकर यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी शरद लेंडे, माऊली खंडागळे, वल्लभ शेळके, डॉ.दिपक आहेर, किरण आहेर, गुलाम नबी शेख, वैभव आहेर, बाबाजी शिंदे, रोहिदास शिंदे, मोहन बांगर, शांताराम सावंत, मोहित ढमाले, अंकुश आमले, शरद चौधरी, अनंत चौघुले, जयवंत घोडके, तुषारभाऊ थोरात,

भास्कर घाडगे, गुलाब पारखे, सुरेखा वेठेकर, पांडुरंग साळवे, सोनल शेटे, अर्चना भुजबळ, रंगनाथ घोलप, संजय गुंजाळ, रोहित नरवडे तसेच आणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे