आमदार अतुल बेनके यांचं काम १ नंबर; ५ वर्ष प्रामाणिकपणे काम:- उदापूर ग्रामस्थ
1 min readउदापूर दि.८:- गावभेट आणि प्रचार दौऱ्याची सुरुवात बनकर फाटा येथून केली त्यानंतर उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, पाचघर या भागातून प्रचार दौरा केला. यादरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थांनी वाजतगाजत आणि बैलगाडीतून मिरवणूक काढून प्रचार यात्रेचे उस्फूर्तपणे आणि उत्साहात स्वागत केले.या वेळी आमदार बेनके बोलताना म्हणाले की, चिल्हेवाडी पाईपलाईन योजना, बिबट सफारी, वडज उपसा सिंचन, क्रीडा संकुल,पर्यटन विकास,शिव स्मारक,रस्ते विकास, पाणी पुरवठा योजना, वळण बंधारे, पाझर तलाव यासारख्या विविध कामांच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारने शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज बिले माफ केली आहेत तसेच महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याची घोषणा, जुन्नर तालुका बिबट आपत्तीग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच बिबट हल्ल्यांच्या संदर्भात विविध उपाययोजना करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे अशा विविध विषयांवर आमदार बेनके यांनी यावेळी मत मांडले. प्रत्येक गावात गेल्या ५ वर्षात पूर्ण केलेली कामे आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार नव्याने मंजूर केलेल्या अनेक कामांचा उल्लेख यावेळी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी देखील केला. यावेळी प्रत्येक गावात मंजूर केलेली कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आलेला निधी आणि तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे भविष्यातील दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन यांसह ५ वर्षात लोकहितार्थ राबविण्यात आलेले अनेक सामाजिक उपक्रम, शासकीय योजना या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचवा असे आवाहन याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.