बांगरवाडीत सत्यशील शेरकर यांचं शिवसैनिकांकडून स्वागत
1 min readबांगरवाडी दि.८:- जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी भागात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी गावभेट दौऱ्यानिमित्त भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
बांगरवाडीत ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्यानंतर या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी पुढील काळात सदैव कटिबद्ध राहील, असं वचन शेरकर यांनी उपस्थित सर्वांना दिलं.
बांगरवाडीत शिवसैनिकांनी लावलेली उपस्थिती आणि मला दिलेली साथ, माझा आत्मविश्वास वाढवणारी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या विचारांचं सरकार आणण्यासाठी मित्रपक्षातील प्रत्येक सहकारी माझ्या खांद्याला खांदा लावून प्रचार करतोय.
हीच एकजूट जुन्नर तालुक्यातील परिवर्तनास कारणीभूत ठरेल, अशी मला खात्री आहे. अशी भावना शेरकर यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शरद लेंडे, अनंत चौघुले, वल्लभ शेळके, मोहन बांगर, डॉ. दिपक आहेर, जयवंत घोडके, महेश बांगर,महेश बांगर, वैभव आहेर, मयूर गुंजाळ, लहु गुंजाळ, रंगनाथ घोलप, जानकु डावखर, अशोक घोडके, शांताराम सावंत,
पल्लवी डोके, अर्चना भुजबळ, अशोक सोनवणे, वसंत कदम दत्ता बांगर, श्रीराम गोसावी, राजू बांगर, मंगेश बांगर, विकास बांगर, राहुल बांगर यांच्यासह बांगरवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.