शेकडो आदिवासी कार्यकर्ते करणार राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश:- आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.९:- जुन्नर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जुन्नरच्या पश्चिम भागातील आदिवासी भागातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) चे उमेदवार तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

बनकर फाटा, उदापूर, मांदारणे, अहिनेवाडी, सारणी, पाचघर, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, आळू, सांगणारे, कोल्हेवाडी १, कोल्हेवाडी २, गवारवाडी, खिरेश्वर, खुबी, करंजाळे, पारगाव, बगाडवाडी, तळेरान, तळमाची, मढ, सीतेवाडी, वाटखळ,

पांगरी तर्फे मढ, कोळवाडी येथील प्रचार दौर्यात तुलसी विहार कृषी पर्यटन केंद्र येथे शुक्रवारी (दि.८) घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बेनके बोलत होते.

आदिवासी नेते काळुराम शिळकंदे व मारुती वायाळ यांनी अतुल बेनके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) त प्रवेश केला. पक्षप्रवेशाने जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील मोठी ताकद अतुल बेनके यांच्या मागे उभे राहिली आहे.

यावेळी जुन्नर बाजार समितीचे अध्यक्ष संजय काळे, काळूराम शिळकंदे, मारुती वायाळ, बबन तांबे, विनायक तांबे, रमेश हांडे, गोविंद साबळे, भाऊ देवाडे, संजय नायकोडी, भाऊसाहेब साबळे, परशुराम गोपाळे, दिनकर जगताप, हर्षल जाधव, नंदा बनकर, मनोहर बनकर, राजू उकिरडे यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

नरहरी झिरवळ यांचा मंगळवारी मेळावा असून कुकडेश्वर मंदिर परिसरात मंगळवारी (दि.१२) आदिवासी समाजाचा मेळावा घेण्यात येणार असून मेळाव्यास राष्ट्रवादी अजित पवार व आदिवासी समाजाचे नेते नरहरी झिरवळ उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्यात शेकडो आदिवासी बांधवांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती बेनके यांनी दिली. आदिवासी समाजात काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करीत असल्याने आदिवासी बांधवांचे प्रबोधन करण्यासाठी घराघरापर्यंत,

शेतीच्या बांधावर, शिवार, वाडी वस्ती, तांड्यापर्यंत जाणार आहे. पुढील काळात आदिवासी समाज राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील यासाठी प्रयत्न केले जातील असे बेनके यांनी नमूद केले.

आदिवासी समाजाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला हिरडा कारखाना सुरू करण्यासाठी जीआर निघाला आहे; परंतु काही तांत्रिक अडचण असल्याने उशीर होत आहे. हिरडा कारखाना सुरू करण्यासाठी फलोत्पादन, पणन, सहकार, कृषी, आदिवासी शबरी महामंडळ, वित्त विभागांमध्ये माहिती घेतली

असून अजित पवार यांनी लोकहिताकरता प्रश्न मार्गी लावला आहे. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे आमदार बेनके यांनी नमूद केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे