पिंपरी पेंढार येथे आमदार अतुल बेनके यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

1 min read

पिंपरी पेंढार दि.७:- आमदार अतुल बेनके यांनी गावभेट आणि प्रचार दौरा पिंपरी पेंढार येथील मळगंगा मातेचे दर्शन घेऊन सुरू केला. प्रचाराच्या निमित्ताने शिवनेर भूषण स्व. केरुशेठ कोंडाजी वेठेकर (बाबा) यांना अभिवादन करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आनंदाने आणि उत्साहाने बैलगाडीतून मिरवणूक काढून पुष्पवृष्टी करत प्रचार यात्रेचे स्वागत केले.जुन्नर तालुक्यातील विविध विकास कामे, रस्ते, वीज, आरोग्य, कृषी, जलसिंचन, क्रीडा, पर्यटन विकासाची कामे यांसह मोठ्या दीर्घकालीन प्रकल्पांचे नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा विविध विषयांवर आधारित गेल्या ५ वर्षातील प्रगतीचा आलेख यावेळी ग्रामस्थांसमोर बेनके यांनी मांडला. तसेच बिबट हल्ले समस्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरविणे अशा विविध अंगी प्रश्नांची सोडवणूक करण्यासंबंधीची भूमिका देखील नागरीकांसमोर स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मला घड्याळ या चिन्हा समोरील बटण दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन याप्रसंगी कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना आमदार अतुल बेनके यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे