मढ पारगावात डॉ. अमोल कोल्हे व सत्यशील शेरकर यांच जंगी स्वागत
1 min read
मढ दि.७:- विधानसभा निवडणुकीच्या गावभेट प्रचार दौऱ्यानिमित्त संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावांमध्ये जाऊन उमेदवार सत्यशील शेरकर ग्रामस्थांशी संवाद साधत आहे. उमेदवाराने मढ – पारगांव येथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न समजून घेत खासदार डॉ. अमोल कोल्हे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मिळून आम्ही हे प्रश्न मार्गी लावणार, असा शब्द शेरकर यांनी ग्रामस्थांना दिला.महायुतीचं सध्याच सरकार असताना भ्रष्टाचार, गुंडगिरी, ढासळलेली आरोग्य व्यवस्था, महिलांवरील अत्याचार, महापुरुषांचा होणार.
अवमान अशा अनेक घटना बघायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला डाग लावण्याचं काम विद्यमान सरकारने केले. त्यामुळे आता जनतेनं ही विधानसभेची निवडणूक हातात घेतली आहे. निश्चितच विधानसभेला परिवर्तन होणारच यात शंका नाही. असे बोलताना शेरकर म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद लेंडे,अनंत चौगुले,माऊली खंडागळे,अंकुश आमले,मोहित ढमाले,तुषार थोरात,शरद चौधरी, सुरेखा वेठेकर, दादाभाऊ बगाड, तुळशीराम भोईर, सईद पटेल, आदिनाथ चव्हाण, बाबा परदेशी, राहुल सुकाळे, जितेंद्र बिडवई, शामराव माळी, अर्चना भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ, तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.