माजी आमदार बाळासाहेब दांगट, सुरेखा निघोट यांची शिवसेनेतून हकालपट्टी

1 min read

पुणे, दि.७:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब दांगट आंबेगाव, तालुक्यातील सुरेखा निघोट व हडपसर येथील गंगाधर विठ्ठल बधे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त दैनिक सामनामध्ये नुकतच प्रसिद्ध करण्यात आल आहे. त्यामध्ये म्हटल आहे की, पुणे जिल्ह्यात पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे बाळासाहेब दांगट (जुन्नर), सुरेखा अनिल निघोट (आंबेगाव), गंगाधर विठ्ठल बधे (हडपसर) यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळवण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे