साळवाडीत सत्यशील शेरकर यांची बैलगाडीतून मिरवणूक
1 min read
साळवाडी दि.६:- गावभेट दौऱ्यानिमित्त बोरी खुर्द (साळवाडी) गावांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी सदिच्छा भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत शेरकर यांची नागरिकांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली.या गावभेटीत तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार शेरकर बोलताना म्हणाले की, तरुणांचे प्रश्न जाणून घेत पुढील काळात जुन्नर तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार, हा विश्वास त्यांना दिला.
शरद पवार, उद्धव ठाकरे व राहुल गांधी यांचे विचार घेऊन पुढील वाटचाल करत असताना जनसेवेचे काम माझ्याकडून होत राहील, असा शब्द मायबाप जनतेला देतो.याप्रसंगी जेष्ठ नेते शरद लेंडे, अनंत चौघुले, माऊली खंडागळे, तुषार थोरात, बाबा परदेशी, संभाजी काळे,
सरपंच संतोष काळे, अक्षय काळे, सावळेराम काळे, रोहन बेल्हेकर, केशव काळे, स्वप्निल काळे, तानाजी काळे, दीपक बेल्हेकर, मच्छिन्द्र बांगर यांच्यासह ग्रामस्थ मंडळी, तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.