सत्यशील शेरकर यांचा प्रचाराचा धडाका सुरू; उंब्रज, खामुंडीत जोरदार स्वागत

1 min read

खामुंडी दि.६:- तालुक्यात सर्व उमेदवार जोरदार प्रचार करत असून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांनी प्रचार दौऱ्याचा धडाका सुरू केला आहे. या दरम्यान त्यांनी उंब्रज न. १, उंब्रज न. २, खामुंडी भागात गावकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामस्थ मंडळींनी पुष्प वर्षावात महाविकास आघाडीच्या शिलेदारांचे अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण केले व विधानसभेची लढाई जिंकण्यासाठी आशिर्वाद दिला. ग्रामस्थांचा व महिला भगिनींचा हा प्रतिसाद खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या सर्वच शिलेदारांचा उत्साह वाढणारा दिसला.यावेळी श्री महालक्ष्मी देवीचे व काळ भैरवनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन मतदारसंघातील मायबाप जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शेरकर यांनी अशिर्वाद मागितला. तसेच पुढील काळात विकासाची कामे करण्यावर आपला जास्तीत जास्त भर राहील, असा विश्वास उपस्थितांना दिला.याप्रसंगी जेष्ठ नेते शरद लेंडे, अनंत चौघुले, मोहित ढमाले, तुषार थोरात, शरद चौधरी, हिरामण शिंगोटे, विशाल दांगट, अशोक हांडे, संजू हांडे, बाळासाहेब शिंगोटे, द. बा. दांगट गुरुजी, बळीराम हांडे, सपना हांडे, डॉ. पोपट चौधरी, प्रविण चौधरी, गणेश चौधरी, गणेश हांडे यांच्यासह महिला भगिनी, तरुण सहकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे