जुन्नर विधानसभेच्या रिंगणात ११ उमेदवार
1 min read
जुन्नर दि.५:- जुन्नर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १७ उमेदवारांपैकी ६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. ४) माघारी घेतल्याने आता ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस अजितपवार गट, घड्याळ), सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, तुतारी वाजवणारा माणूस),
देवराम लांडे (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंर), अपक्ष : आकाश आढाव (ट्रंपेट), आशा बुचके (प्रेशर कुकर), रमेश हांडे (अंगठी), राजेंद्र ढोमसे (ऊस शेतकरी), शरद बाबासाहेब सोनवणे (शिट्टी), शरद भिमाजी सोनवणे (ऑटो रिक्षा), शरद शिवाजी सोनवणे (चहाची गाळणी), सुखदेव खरात (ब्रिफ केस)
तर या रिंगणातून जुबेर शेख, योगेश तोडकर, काळू गागरे, रमेश ऊर्फ भास्कर पाडेकर, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली खंडागळे, निलेश भुजबळ या ६ जणांनी निवडणूक रिंगणातून माघारी घेतलेली आहे.