जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना; अतुल बेनके यांचं पारड जड; बेनके यांची प्रचारात आघाडी; बेनके समोर तगडा उमेदवार मिळेना, आघाडी समोर अद्याप पेच कायम
1 min read
जुन्नर दि.२६:- जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरला नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. तालुक्यात चौरंगी पंचरंगी लढत होण्याची शक्यता असून महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
सध्या आमदार अतुल बेनके यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये गावोगावी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. असल्याने त्यांचे पारड तालुक्यात जड दिसत आहे. त्यांना तोंड देण्यासाठी तालुक्यात महाविकास आघाडीला तगडा उमेदवार मिळत नसल्याची व ठरत नसल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. अतुल बेनके यांना तालुक्यात पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाते गेल्या पाच वर्षात तालुक्याला बेनके यांनी पाण्याची कमी पडू दिली नाही.
तसेच गावोगावी बेनके यांचे तगडे कार्यकर्ते असून त्यांच्या सरपंचांची संख्याही तालुक्यात जास्त आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी जाहीर झाली केली आहे.
भाजपच्या नेत्या आशा बुचके यांच्याबरोबरच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आतापर्यंत आशा बुचके तसेच आदिवासी नेते देवराम लांडे म्हणून शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार शरद लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले, तुषार थोरात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख इच्छुक उमेदवार माऊली खंडागळे यांनी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार सत्यशील शेरकर यांना उघड उघड उमेदवारी द्यायला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ अद्यापही मिटला नसल्यामुळे संभ्रम कायम आहे. विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे सदस्यत्व आणि उमेदवारीची मागणी यापूर्वीच केलेली आहे. महाविकास आघाडीची ही जागा उबाठा गटाची असल्याने ही जागा आपल्याला सुटावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार या पक्षाला मिळण्याचे ठरले असून, सत्यशील शेरकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अपक्ष उमेदवार म्हणून आकाश राजेंद्र आढाव यांनी गुरुवारी तर निलेश नामदेव भुजबळ यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवार अखेर एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी दिली.दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भूमिका निर्णायक राहणार असून त्यांचा कल सत्यशील शेरकर यांनाच उमेदवारी मिळावी याकडे दिसत आहे.
यामुळे निष्ठावान राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात असल्यामुळे याचा निकालावर निश्चित परिणाम होईल यात काही शंका नाही. दरम्यान सध्यातरी सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला असून प्रचारात मात्र विद्यमान आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी लवकर जाहीर झाल्यामुळे त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.