बोरी बुद्रुक गावात बिबट्याच्या हल्ल्यातुन महिला थोडक्यात बचावली
1 min readबोरी दि.२५:- जुन्नर तालुक्यात बिबटयाची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली असून नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले असुन दररोज कुठेना कुठे पाळीव प्राणी हल्ला होत आहे तर नागरीकांना दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे. बोरी बुद्रुक येथील एका मळयात रहात असलेल्या मंगल गणेश काळे या आपल्या शेतात बुधवार दि.२३ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घास कापत असताना एक बिबटया शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतामधुन येऊन घासाच्या शेतात दोन ते तीन फुटांच्या अंतरावर येऊन बसल्याचे काळे यांच्या निर्दषणास आल्यावर मोठ्याने आरडाओरड करत घराकडे धावत गेल्या असता.बिबट्याने मोठा आवाज ऐकल्याने परत ऊसात निघुन गेला यामुळे मंगल काळे या बिबट्याच्या हल्ल्यातुन थोडक्यात बचावल्या आहेत. परंतु धावत असताना त्या दोन ते तीन वेळा पडल्याने त्यांच्या पायाला मार लागला आहे. घटनास्थळी वन अधिका-यांनी येऊन भेट देत पहाणी करत तात्काळ पिंजरा लावला आहे.दरम्यान राजुरी येथील गव्हाळी मळयात रहात असलेले संदेश निव्वृती हाडवळे हे चारा काढण्यासाठी शेतात गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना हाडवळे यांनी या ठिकाणी मोठ्याने आरडाओरड केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. व या ठिकाणी काही फुटांच्या अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असल्याने पालक तसेच नागरीकांमध्ये भितीचे निर्माण झाले असुन बोरी बुद्रुक व राजुरी या दोन्हीही ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावला आला आहे.