हिंगोलीत दोन वाहनांतून १.४० कोटी जप्त
1 min read
हिंगोली दि.२६:- शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या वाहनांतून १.४० कोटी रुपयांची रक्कम शुक्रवारी दुपारी जप्त केली आहे.
सदर रकमेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली विधानसभा मतदारसंघात तीन विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.
निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी भेटवस्तू किंवा रोख रकमेचा वापर केला जाऊ नये, यासाठी पोलीस विभागाने वाहनांची तपासणी करण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली आहे.
त्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन केली आहेत.