पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत टेम्पोत १३८ कोटींचे सोने पकडले; सोनं आलं कुठून?

1 min read

पुणे दि.२५:- आगामी विधानसभेच्या अनुषंगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर शहरातील विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. काही दिवसापूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर खासगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती.

सुरुवातीला ही रक्कम १५ कोटी असल्याचे जाहीर केले. नंतर ५ कोटी असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा मावळमध्ये पावणे अठरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली. आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणेपोलिसांनी नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले आहे.

आज सकाळी पोलिसांच्या नाकाबंदीत ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलिसांनी सोने, चालक आणि वाहन ताब्यात घेतले असून ते कुठून आले? कुणाचे आहे? याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुणे पोलीस पुढील तपास करत आहेत.

ऐन निवडणुकीच्या काळातच मोठ्या प्रमाणावर रोकड आणि त्यानंतर असं सोनं मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वाहन हे ट्रान्सपोर्टचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे