डिझेल चोरी करणाऱ्या दोघांस आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
1 min read
आळेफाटा दि.२३:- आळेफाटा पोलिस स्टेशन कडुन मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत सोपान लक्ष्मण शिरतर रा.आळे ता. जुन्नर जि. पुणे यांच्या मालकीचे टाटा कंपनीची १२ टायर गाडी क्रमांक एम.एच. १४ ई.एम ७१६७ ही यामधील २०० लीटर डिझेल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी अज्ञात चारचाकी वाहनातून येवून चोरी करून नेलेबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना गुन्हे शोध पथकास देण्यात आल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक हे सदर गुन्हयातील आरोपींचा व गुन्हयातील वापरलेल्या वाहनाचा शोध घेत असताना, नमुद गुन्हे शोध पथकाला गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे १) गणेश लक्ष्मण क्षिरसागर वय २२ वर्षे रा. वाकी खुर्द ता. खेड जि. पुणे.
२) प्रतिक मुकुंद फापाळे वय २१ वर्षे रा. पाटीलनगर, वाकी खुर्द ता. खेड जि.पुणे हे सुट्टया पध्दतीने डिझेलची विक्री करत असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने वरील दोन आरोपीस ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिकचा तपास केला असता त्यांनी गुन्हा हा त्यांच्या साथिदारांसह केला.
असल्याची कबुली दिल्यानंतर सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे तसेच फरार आरोपींचा शोध चालू आहे. आरोपींकडून गुन्हयात वापरलेली क्रियटा कार एम.एच १२ व्ही. व्ही ०८९६ अंदाजे अंदाजे ८ लक्ष व १ लाख ४३१ रुपयांचे डिझेल असा एकुन ९ लाख ४३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी हि पुणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहा. पोलीस उपनिरक्षक चंद्रा डुंबरे,
पो. हवालदार राजेंद्र हिले, भिमा लोंढे, विनोद गायकवाड, संजय शिंगाडे, पंकज पारखे, पंडीत थोरात, पोलीस अंमलदार अमित माळुंजे, नविन अरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे, तौफिक शेख, विष्णु दहिफळे यांनी केली आहे.