बेकायदा वास्तव्य करणारे २१ बांगलादेशी नागरीक दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

1 min read

रांजणगाव दि.२४:- दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रा. चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलींग करत असताना त्यांचे पथकातील सहा. फौज. विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक हे बेकायदेशीरपणे रहात आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्था.गु.अ.शाखा, पुणे ग्रा. व महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखे मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफसह कारेगाव परीसरामध्ये मिळालेल्या बातमीच्या आधारे शोध घेण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसमांचा शोध घेतला असता मौजे कारेगावच्या हद्दीमध्ये भाड्याने राहण्यास असणारे १५ पुरुष, ०४ महिला व ०२ तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले आहेत. सदर इसमांना पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता. सदरचे इसम हे बांगलादेशी नागरीक असुन त्यांनी भारत देशात बेकायदेशीररित्या भारत बांगलादेश सिंमा ओलांडुन कोणताही वैध्य भारतीय पारपत्र परवाना धारण करत नसताना देखील भारतामध्ये प्रवेश करून महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हयातील कारेगाव ता. शिरूर येथे बनावट भारतीय देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यापैकी ०९ इसमांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व ०१ इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळुन आले आहे.सदर मिळुन आलेल्या बांगलादेशी नागरीक नामे १) अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान वय ५० वर्षे, २) मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार वय ३२ वर्षे ३) शफिकउल अलीमिया शेख वय २० वर्षे ४) हुसेन मुखिद शेख वय ३० वर्षे, ५) तरिकुल अतियार शेख वय ३८ वर्षे ६) मोहम्मद उमर फारूख बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख वय ३२ वर्षे, ७) शाहिन शहाजान शेख वय ४४ वर्षे, ८) मोहम्मद हुसेन शेख वय ३२ वर्षे, ९) रौफ अकबर दफादार वय ३५ वर्षे १०) इब्राहिम काजोल शेख वय ३५ वर्षे, ११) फरीद अब्बास शेख वय ४८ वर्षे, १२) मोहंम्मद सद्दाम अब्दुल सखावती वय ३५ वर्षे, १३) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार वय ३२ वर्षे, १४) आलीमिया तोहकील शेख वय ६० वर्षे, १५) मोहम्मद इसराईल फकीर वय ३५ वर्षे, १६) फिरोजा मुताकीन शेख वय २० वर्षे, १७) लिपीया हसमुख मुल्ला वय ३२ वर्षे १८) सलमा मलीक रोशन मलीक वय २३ वर्षे, १९) हिना मुल्ला जुल्फीकार मुल्ला वय ४० वर्षे, २०) सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश वय ३० वर्षे, २१) येअणुर शहदाता मुल्ला वय २५ वर्षे, सर्व सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे, मुळ रा बांगलादेश. यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सदर प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनला वरील व्यक्तींच्या विरुध्द गु.र.न ५९३/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३३६ (२), ३३६ (३),३३८,३४० (२) तसेच सहकलम भारतीय पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३, विदेशी अधिनियम १९४६ चे कलम १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. शिरुर कोर्टात हजर केले असता मा. हु कोर्टाने त्यांना दि. २४/१०/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.सदर कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रा., रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा. फौज. विशाल गव्हाणे, पो.हवा विशाल भोरडे, पो.हवा रविंद्र जाधव, पो.कॉ मोसीन शेख, पो.कॉ ओंकार शिंदे, तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोसई. अविनाश थोरात, सहा. फौजदार डी. आर. शिंदे पो.हवा. विजय सरजीने, विलास आंबेकर, पो.काँ. उमेश कुतवळ, म.पो.हवा. विद्या बनकर, म.पो.काँ. शितल रौंधळ यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे