जुन्नर परिसरातील बेकायदा दारू विक्रेते ताब्यात

1 min read

जुन्नर दि.२३: – जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्नर, बेलसर, धनगरवाडी, निमगिरी, लेण्याद्री ठाकरवाडी, आपटाले, हडसर, गोळेगाव, सावरगाव, या गावांमध्ये देशी-विदेशी तसेच हातभट्टी दारू बेकायदा बिगर परवाना जवळ बाळगून चोरून विक्री करीत असताना पोलीस पथकांनी या ठिकाणी छापे मारून दारूचा मुद्देमाल जप्त करीत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले आहे. दिलीप कोंडाजी जाधव, संतोष चंद्रकांत भोसले, जालिंदर काशिनाथ मोधे, बाळू मोघा रडे, गणेश दगडू खैरे, संदीप शिवाजी भालेकर, पांडुरंग होना गवारी, राम बाबू हिलम, हृषीकेश संजय काळे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे