आळंदीत खंडणीसाठी गुंडाकडून दहशत
1 min readआळंदी दि.२१:- येथे आपल्याला दरमहा खंडणी द्यावी, यासाठी एका गुंडाने कोयत्याच्या धाकाने दहशत निर्माण केली. तसेच एकाकडून एक हजारांची खंडणीही घेऊन गेला. ही घटना आळंदी येथे घडली. केतन शिंदे (रा. इंद्रायणीनगर, आळंदी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. उमेश किसन तापकीर (वय २८, रा. वडमुखवाडी) यांनी शुक्रवारी (दि. १८) याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे पुढील तपास करीत आहेत.