महिलेच्या डोळ्यात मिर्चीपूड फेकून मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद

1 min read

रांजणगाव दि.१९:- रांजणगाव पो स्टे गु र नं 484/24 भा.न्या.सं अधि.2023 चे कलम 309(4)अन्वये दि. 12/10/24 रोजी दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी नामे ज्योती मारुती मिसाळ, (रा.खंडाळे ता शिरूर जि पुणे) ह्या त्यांचे चहा चे टपरीवर असताना मोटर सायकल वरून आलेल्या 2 इसमानी चहा व सिगारेट मागून फिर्यादी चहा करत असताना. फिर्यादी चे डोळ्यात मिरची पूड टाकून फिर्यादीचे गळ्यातील मणी मंगळसूत्र जबरीने ओढून मोटर सायकल वरून पळून गेले होते. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणनेकामी पो अधिक्षक पंकज, यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुसरून स्था. गु शाखेचे पथक (सणसवाडी ता शिरूर जि पुणे) येथे पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीदारा कडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा इसम नामे तुकाराम उर्फ सुशील दत्तात्रय मुंढे व त्याचा मित्र यांनी मिळून केला आहे.त्यावरून पथकाने सापळा रचून सणसवाडी येथून इसम नामे तुकाराम उर्फ सुशील दत्तात्रय मुंढे (रा गनेगाव खालसा ता शिरूर) यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मित्र दीपक उर्फ संकेत राठोड रा फडतरे वस्ती याचे सह केल्याची कबुली दिल्याने स्था.गु शाखेचे पथकाने त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. आरोपी नामे तुकाराम उर्फ सुशील दत्तात्रय मुंढे (रा गनेगाव खालसा ता शिरूर जि पुणे) यास पुढील कारवाई कामी रांजणगाव पोस्टेचे ताब्यात दिले.सदरची कारवाई पो अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पो अधि. रमेश चोपडे, उप विभा. अधि. प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु. शाखेचे व पो नि अविनाश शिळीमकर,पो सं ई अमित सिद पाटील पो हवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, पो अं सागर धुमाळ यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे