केबल व डिपी मधील कॉपर चोरणारी अट्टल टोळी जेरबंद; ५ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; आळेफाटा पोलीसांची कामगीरी

1 min read

आळेफाटा दि.१:-जुन्नर तालुक्यातील आळेफाटा व परिसरातील इलेक्ट्रीक टॉवरवरील केबल व डिपी मधील कॉपर चोरणारी अट्टल टोळी जेरबंद पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून ५ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमल जप्त आळेफाटा पोलीसांनी जप्त केला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,
आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक १९/०९/२०२४ रोजी फिर्यादी विभासकुमार भोलाप्रसाद महातो (वय ५३ वर्षे धंदा कल्पतरू प्रोजेक्ट्स लिमीटेड असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरी सध्या रा. अमोल मशिनरी चे जवळ आळेफाटा ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली की, कोळवाडी आळे गावाजवळील टॉवर नंबर जी २८२ ते जी २८३ टॉवरला लावलेली AAAC640SQ MM COMDUCTOR असलेली ७४० मीटर अॅल्युमिनीअम तार व स्पेस डेपर १२ नग हे दिनांक ११/०९/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वा.ते १९/०९/२०२४ रोजी सकाळी ०९/०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याचे फाय‌द्यासाठी चोरून नेली आहे. अशी अज्ञात चोरट्‌याविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली होती. सदर गुन्ह‌याचे तपासादरम्यान दाखल गुन्ह्याचे तांत्रिक विष्लेशन करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अभिजीत जयराम वाघ रा. मांजरवाडी ता. जुन्नर जि. पुणे हा टॉवरच्या मोठ्‌या अॅल्युमिनिअम तारा चोरत असुन तो त्याची विक्री सुध्दा करतो. अशी गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाल्याने पोलिसांनी मांजरवाडी येथे जावुन दिले पत्यावर सदरचा संशयित अभिजीत जयराम वाघ रा. मांजरवाडी ता. जुन्नर जि. पुणे याचा दिले पत्यावर शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्याचेकडे कोळवाडी येथील टॉवरवरील इलेक्ट्रीक तारांचे चोरीचे संदर्भाने चौकशी केली असता. त्याने मोटारचोरी टॉवरवरील इलेक्ट्रीक तारांचे चोरीचे संदर्भाने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्याचेकडे त्याचेसोबत अजुन कोणकोण साथीदार होते याबाबत चौकशी केली असता त्याने त्याचेसोबत सदरचे चोरीमध्ये १) अभिजीत जयराम वाघ रा. मांजरवाडी ता. जुन्नर जि.पुणे २) सुरन खंडु विश्वासराव रा. थोरांदळे ता. आंबेगांव जि. पुणे ३) सोहम ज्ञानेश्वर गोसावी रा. खोडद ता. जुन्नर जि. पुणे ४) अजय संतोष भालेराव रा. खोडद ता. जुन्नर जि. पुणे व २ अल्पवयीन मुले यांचेबरोबर मिळुन सदरचे गुन्हे केले असल्याबाबत सांगीतले असुन सदरचे इसमांचा त्यांवे दिले पत्यावर पोलिसांनी शोध घेतला असता.

ते मिळुन आल्याने त्यांना सदर गुन्ह्याचे अनुशंगाने ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली. त्यांनी टॉवरवरील तारा तसेच डिपीमधील कॉपर तारा चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन त्यासंदर्भाने आळेफाटा पोलीस स्टेशन येथे १) गु.र.नं.२७९/२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२), ३(५),३१७ (२) २) गु.र.नं.११८/२०२४भा.द.वि. कलम ३७९ भा.वि. का. कलम १३६ ३) गु.र.नं.१३५/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ भा.वि.का. कलम १३६ ४) गु.र.नं.१३०/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ भा.वि. का. कलम १३६ असे गुन्हे दाखल आहेत. यातील अटक आरोपी यांनी सदर चोरलेले अॅल्युमिनिअम तारा व डिपीमधील कॉपर तारा या गुन्ह्याचे कामी जप्त केले असुन. गुन्ह्यात वापरलेली ५,००,०००/- एक महींद्रा कंपनीची पांढरे रंगाची पिकअप गाडी सुध्दा सदर गुन्ह्याचे कामी जप्त करण्यात आली आहे. त्यांचेकडुन एकुण ४ गुन्हे उघडकीस आले असुन एकुण ५,९३,५५० /- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला.सदर चोरीबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे एकुण ४ गुन्हे दाखल सदर चोरट्‌यांनी चोरलेला मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आलेले असुन पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेले आहे.सदरची कामगिरी हि पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण), रमेश चोपडे अपर (पोलीस अधिक्षक पुणे विभाग), रविंद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे साो यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार भिमा लोंढे, पोलीस हवालदार पंकज पारखे, पोलीस हवालदार अमित पोळ पो.कॉ. अमित माळुंजे, पो. कॉ. नवीन अरगडे, गणेश जगताप, ओंकार खुणे, सचिन कोबल, गणेश सपकाळ यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश तायडे साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भिमा लोंढे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे