विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीत भोंडला उत्साहात साजरा

1 min read

साकोरी दि.१४:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल साकोरी मध्ये भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक पी.एम साळवे, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी च्या प्राचार्या रूपाली पवार- भालेराव, पी.एम हायस्कुल चे प्राचार्य रमेश शेवाळे आदींची उपस्थिती लाभली.

रुपाली पवार -भालेराव यांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभी सरस्वतीचे पूजन केले . प्रास्तविकेत रोहिणी कदम यांनी भोंडला सणाचे महत्त्व आणि वेगवेगळ्या परंपरा याविषयी माहिती दिली. सीसीए विभाग प्रमुख सुलभा डेरे यांनी आपल्या मनोगतात भोंडल्याचे निमित्त सर्व महिला एकत्र जमतात, फेर धरतात व वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणतात. यातून स्त्री शक्ती च्याएकीचा जागर होतो. अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी अंजली चासकर, अनिता पाचपुते, माई काळदाते यांनी छोट्या छोट्या मुलींचे औक्षण करून कन्यापूजन केले. या वेळी महिला शिक्षिका तसेच शाळेतील सर्व मुला मुलींनी फेर धरून पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व महिला शिक्षिका,प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचा संपूर्ण स्टाफ ने परिश्रम घेतले यावेळी सूत्रसंचालन अंजली चासकर यांनी केले तर आभार अनिता पाचपुते यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे