समर्थ संकुलात स्वर्गीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली; रतन टाटांच्या जाण्याने समाजसेवेतील उद्योग रत्न हरपले:-वल्लभ शेळके

1 min read

बेल्हे दि.१४:- प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या हितासाठी आणि कुटुंबाच्या उद्धारासाठी जगत असतो. परंतु रतन टाटा यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले होते. ते गेल्याने खऱ्या अर्थाने समाज सेवेतील रत्न हरपले असून त्यांच्या जाण्याने समाजामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे. ती कधीही भरून न येण्यासारखी असल्याचे मत समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी व्यक्त केले.स्वर्गीय रतन टाटा यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले, रिसर्च अँड इनोव्हेशन सेलचे डायरेक्टर डॉ.प्रतीक मुणगेकर सर्व विभागांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.प्रसिध्द उद्योगपती पद्मविभुषण रतन टाटा हे खऱ्या अर्थाने भारतीय उद्योग विश्वातील कोहिनुर हिरा होते. त्यांच्या निधनाने एक प्रखर राष्ट्रप्रेमी आणि सर्व सामान्यांविषयी आस्था आणि आपुलकी असणाऱ्या एका महान उद्योजकाला आपण सर्व मुकलो आहोत असे उद्गार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी काढले.रतन टाटा हे एका प्रथितयश कुटुंबामधे जन्माला आल्यानंतर परदेशामध्ये आर्किटेक्ट ची पदवी प्राप्त केल्यानंतर सुद्धा टाटा स्टील ह्या कंपनीत फ्लोअर शॉप पासून त्यांनी कामाला सुरवात केली. सायकल वरती प्रवास करून कामगारांच्या बरोबर राहून कामगारांच्या अडचणी इथपासून सूरवात केल्या नंतर आज शंभर पेक्षा आधिक कंपन्यांचा विस्तृत असा टाटा समूहाचा वटवृक्ष त्यांनी उभारलेला आहे. ही अलौकिक अशी बाब आहे. परंतु आजच्या तरुण पिढीसाठी हे अत्यंत प्रेरणादायी बाब आहे की,इतक्या मोठ्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा खालच्या स्तरापासून कामगारांमध्ये मिसळण्यापासून तर छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार कसा करता येईलही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामधे दैनंदीन ज्या छोट्या मोठ्या गोष्टी लागतात त्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती टाटा समूहाने केलेली आहे. १०० पेक्षा अधिक कंपन्यांचा जो विस्तार झाला आहे त्यामध्ये टाटा मोटर्स सारखी जागतिक पातळीवरची प्रसिद्ध असणारी ऑटोमोबाईल ची कंपनी असेल. किंवा टीसीएस सारखी सॉफ्टवेअर क्षेत्रातील भारतातील नामांकित कंपनी असेल यांनी खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरती आपल्या दर्जेदार व महत्वपूर्ण सेवेने आपल्या कामाचा दर्जा उंचावलेला आहे.रतन टाटा यांच्या जीवनातील सर्वात मोठे बलस्थान काय असेल तर त्यांनी जपलेली मूल्ये आहेत. सर्वसामान्यांचा आणि लोककल्याणाचा समाजाच्या कल्याणाचा विचार हा सातत्याने त्यांच्या केंद्रस्थानी होता. आणि म्हणूनच नैतिक मूल्यांना त्यांनी आयुष्यभर खूप महत्त्व दिलं. कोरोना सारख्या महामारी मध्ये देशाला त्यांनी खूप मोठी मदत केली.त्याचबरोबर अनेक युवा उद्योजकांना त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिरस्थावर व्हावं यासाठी त्यांनी अनेक स्टार्टअपला त्यांनी मदत केल्याची उदाहरणे आहेत. भारताचा जो जागतिक व्यापार आहे त्यातदेखील मोठे योगदान हे टाटांचे राहीलेले आहे.टाटांनी चहा, मीठ, पाणी, सोने इथपासून तर घड्याळ, विमानापर्यंत जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये अशी क्वचित एखादी वस्तू असेल जी टाटा समूह बनवत नाही.आणि टाटा उद्योग समूहाचा हे एव्हढं मोठं विस्तारित रूप करण्यामध्ये खऱ्या अर्थाने रतन टाटांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. टाटा समूहाने निर्माण केलेलं ताज महाल हॉटेल असेल किंवा टायटन घड्याळाचा ब्रँड असेल. किंवा टाटा इंडस्ट्री किंवा टाटा इंटरनॅशनल, टाटा स्टील, टाटा टेलि सर्व्हिसेस त्याचबरोबर एअर इंडिया ही जगत विख्यात असणारी ब्रँड आहेत आणि रतन टाटांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेली आहेत. रतन टाटा हे खऱ्या अर्थाने एक मूल्यनिष्ठ व्यक्तिमत्व होते की ज्यांनी आयुष्यभर मूल्यांची जोपासना केली. आणि तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व संशोधनासाठी कल्पकतेला वाव देणारी सामान्य माणसाला स्वतःची चार चाकीच स्वप्न पूर्ण व्हावे. यासाठी त्यांच्या खिशाला परवडेल असे स्वस्त दरात टाटा नॅनो कार उपलब्ध करून दिली. भारत सरकारने व पद्मविभूषण हे महत्त्वाचे नगरी सन्मान देऊन सन्मानित केले. व्यवसायिक आणि नैतिक मूल्य जोपासणारे खरे समाजसेवक म्हणून रतन टाटा यांच्या कार्याचा गौरव केला जातो. आणि म्हणूनच प्रतिवर्षी रतन टाटांच्या स्मृती कायम तरुणांवर, युवा उद्योजकांच्या मनावर कायम रहाव्या यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलातील ज्या विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायामध्ये उंच भरारी घेतली असेल अशा युवा उद्योजकांचा रतन पद्मविभूषण रतन टाटा उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करणार असल्याचे असे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी रतन टाटा यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून संकुलाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे