“फार्मासिस्ट डे निमित्ता आळे फार्मसी कॉलेज मध्ये जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न”

1 min read

आळे दि.१४:- विशाल जुन्नर सेवा मंडळाचे इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी आणि इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन येथे ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जिल्हयातुन विविध महाविदयालयातील २४७ विदयार्थ्यांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेमध्ये अनंत चिंदारकर, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवळ याने प्रथम क्रमांक मिळवीला. ज्ञानेश्वरी शिंदे, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी आळे हिने व्दितीय क्रमांक मिळवीला व वैष्णवी पाटील, एम.इ. टी. एस इंस्टीट्युट ऑफ फार्मसी नाशिक हिने तृत्तीय क्रमांक मिळवीला. सर्व सहभागी विदयार्थ्यांचे विशाल जुन्नर सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.डी. गायकवाड, इंस्टीटयूट ऑफ फार्मसी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. हांडे व इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन महाविदयालयचे प्राचार्य अनुराधा ताजवे यांनी अभिनंदन केले. व शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी प्रा. अक्षदा हुलवळे व प्रा. सुप्रिया फल्ले यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे