व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

1 min read

वडगाव कांदळी दि.१६:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम’ यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न करण्यात आला.भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान साधनेत मग्न होते. म्हणूनच 15 ऑक्टोंबर ही त्यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी केली जावी याला विशेष औचित्य आहे. वाचनाचे महत्त्व शाळेच्या शिक्षिका शितल काळे यांनी विद्यार्थ्यांना पटवून देताना सांगितले की, वाचन ही अशी सिद्धी आहे, की ज्यामुळे आपल्याला एका ह्यातीत अनेक आयुष्य जगता येतात- अनुभव विश्व व्यापक होते. जाणीवा समृद्ध होतात. आकलन शक्ती वाढते. जीवनातील विविध अनुभवांचे दर्शन घडवणारा पुस्तका सारखा दुसरा गुरु नाही. म्हणूनच शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना “वाचाल तर वाचाल” असा मोलाचा संदेशही दिला.या दिनानिमित्त विद्यार्थ्याचे अवांतर वाचन घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी जे वाचन केले त्यातून त्यांना काय आकलन झाले? हे समजण्यासाठी सारांश लेखनही घेण्यात आले.‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांना दररोज कमीत कमी एका गद्यांश वाचन करावे हा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या. सर्व समन्वयिका व शिक्षक वृंद यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.या उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचेही मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे