बेल्हे जिल्हा परिषद शाळेला जुन्या नाणी व नोटांची भेट

1 min read

बेल्हे दि.१६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ शाळेचे 1965 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिली मध्ये शिकत असणारे माजी विद्यार्थी नाथा तुकाराम बो-हाडे यांनी स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला घेणे कामी शाळेला भेट दिली. भेटीमध्ये त्यांच्याकडे जुन्या काळातील अगदी शिवकालीन काळापासून नाणी व नोटा यांचा संग्रह आहे याची त्यांनी माहिती दिली. यानंतर सर्व नाणी व नोटा शाळेतील विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी प्रदर्शन दाखवावे अशी विनंती मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी केली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी नाणी व नोटा यांचे प्रदर्शन मांडून ते सर्व मुलांना दाखविले. यामध्ये एक रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत नोटांचा समावेश होता. तसेच कवडीपासून ते वीस रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नाण्यांचा समावेश होता परदेशातील नाणी, शिवकालीन नानी, ब्रिटिशकालीन नाणी, यांचाही यामध्ये समावेश होता. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत नाणी व नोटा कशा जमवल्या याबाबत माहिती दिली. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी असले कारणाने त्यांनी मुलांसाठी त्यापैकी काही अनमोल अशी निवडक नाणी व नोटा शाळेला कायमस्वरूपी भेट दिल्या.ज्याचा उपयोग कायमस्वरूपी मुलांना जुन्या काळातील नाणी व नोटा यांचा परिचय करून देताना होणार आहे याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले, मुख्याध्यापिका मिरा बेलकर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचा सन्मान केला व शाळेला मदत केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे