मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान संस्थेच्या नवीन श्री.एल.डी.आहेर फार्मसी महाविद्यालयास मान्यता
1 min read
आणे दि.१०:- मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आणे (ता. जुन्नर) या संस्थेच्या नवीन श्री एल.डी.आहेर फार्मसी महाविद्यालय आणे (ता.जुन्नर जि.पुणे) यास मान्यता मिळाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान च्या श्री.एल.डी.आहेर फार्मसी महाविद्यालयास यावर्षी पासुन मान्यता मिळाली असुन या महाविद्यालयात डी.फार्मसी व बी.फार्मसी हे दोन कोर्स सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव किरण आहेर यांनी दिली.
सदर संस्था ही २०१२ पासुन शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन संस्थेचे जाळे हे नगर जिल्ह्यात विस्तृत प्रमाणात असुन आता पुणे जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली असल्याने पठार भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलीना चांगले शिक्षण घेण्यास एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
असे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.दीपक आहेर यांनी नमूद केले. सदर महाविद्यालयामध्ये उच्चशिक्षित शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शिष्यवृत्ती सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध असुन यावर्षी डी.व बी.फार्मसी ला प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांनी महाविद्यालय मध्ये संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मीरा आहेर यांनी केले.