समर्थ शैक्षणिक संकुलात शारदीय नवरात्रौत्सव व खंडे नवमी निमित्त यंत्र पूजन

1 min read

बेल्हे दि.११:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट राजुरी संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आय टी आय), बेल्हे (ता.जुन्नर) येथे शारदीय नवरात्रौत्सव व खंडेनवमीनिमित्त भारतीय परंपरेनुसार यंत्र पूजन व शस्र पूजन करण्यात आले. संकुलातील आय टी आय विभागाबरोबरच इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक,एमबीए,ज्युनियर कॉलेज,बीसीएस,गुरुकुल, फार्मसी, लॉ, बीबीए, बीसीए, एमसीए, एम सी एस, समर्थ टाटा मोटर्स,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल, विभागीय प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र आदी सर्वच विभागांमध्ये ही यंत्र औजारे यांची पूजा मोठ्या आनंदाने व विधिपूर्वक करण्यात आली.संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने व यंत्र पूजन करून खंडेनवमी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, उपप्राचार्य विष्णू मापारी, बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले, टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.राजेंद्र निचित, प्रा.संजय कंधारे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.भारतीय धर्मपरंपरेनुसार नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खंडे नवमीला यंत्र, औजारे, शस्रपूजन केले जाते. वैद्य डॉक्टरांपासून ते कुशल कारागीरांपर्यंत असे पारंपारिक व्यवसायातील लोक दररोजच्या उपयोगात शस्रांची पूजा केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा प्रारंभ इ.चांगल्या गोष्टीची सुरुवात केली जाते. घर, गाडी, बंगला खरेदी केला जातो. सोन्या चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू केले जातात. नवी नाटके, चित्रपट यांचे मुहूर्त होतात. पुस्तके प्रकाशित होतात.र्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व उपस्थित मान्यवरांनी यावेळी यंत्र अवजारे व शस्रांची पूजा केली. यंत्रासमोर आकर्षक अश्या आणि ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या बोलक्या रांगोळ्यांनी मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. स्त्री भ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, स्वच्छता अभियान, पर्यावरण संतुलन आदी विषयांवर आधारित रांगोळ्या, संदेश देणारे संदेश फलक यामुळे खऱ्या अर्थाने खंडे नवमी साजरी झाल्याचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे व उपप्राचार्य विष्णू मापारी म्हणाले.माऊली शेळके म्हणाले की, यंत्र ही साधना असून यंत्राचे तंत्र लक्षात घेऊन फक्त आजच्याच दिवशी नाही तर वेळोवेळी या यंत्रांकडे लक्ष देऊन त्याची निगा राखली तर यंत्राचे तंत्र आपल्याला जीवनात एक नवीन मंत्र देऊन जीवन अधिक सुसह्य करण्यात मदत करतील.आय टी आय व कार्यशाळेतील सर्व निदेशक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.सर्व उपस्थितांचे आभार स्वप्निल कवडे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे