व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्रौत्सवा निमित्त दांडिया व नृत्य
1 min readनगदवाडी दि.११:- ‘विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल’ मधील विद्यार्थ्यांनी – शारदीय नवरात्र उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला. या निमित्ताने सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करून शाळेत उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमिला डुंबरे यांनी नवरात्र उत्सव व दसरा या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत ‘सरस्वती पूजन’ संपन्न करण्यात आले. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान साजरा होणारा नवरात्रौत्सव आणि त्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांना नवरात्रौउत्सव व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी दांडिया रास व नृत्य याद्वारे नवरात्रौउत्सवाचा आनंद घेतला.विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.