वळसे पाटील महाविद्यालयात महिलांच्या समस्या व उपाय योजना’ विषयावर मार्गदर्शन

1 min read

निमगाव सावा दि.९:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे महिला सबलीकरण मंच व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नवरात्र महोत्सव निमित्ताने महिलांसाठी व मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य अधिकारी डॉ.तेजश्री ढवळे प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा यांनी महाविद्यालयातील सर्व मुलींसाठी ‘महिलांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, स्वच्छता कशी राखावी, त्याचबरोबर आहार कसा घ्यावा याविषयी माहिती दिली.तसेच सर्व विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी केली.
त्याचबरोबर आमदार अतुल बेनके यांच्या पत्नी गौरी बेनके यांनी सर्व महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन चे मोफत वाटप केले.या कार्यक्रमाकरिता प्रा.अश्विनी जोरे, प्रा.पूनम कुंभार, प्रा.पूनम पाटे, प्रा.मंगल उनवणे, प्रा.पूजा मॅडम, सर्व प्राध्यापक व प्राध्यापके तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संस्था प्रतिनिधी कविता पवार, प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नीलम गायकवाड, प्रास्ताविक प्रा. प्राजक्ता गाडगे आणि प्रा.माधुरी भोर यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे