बेल्हे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थांची गुप्त विठोबा मंदिर भेट

1 min read

बेल्हे दि.६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर – १ शाळेची शैक्षणिक परिसर भेट बांगरवाडी (ता.जुन्नर) येथील गुप्त विठोबा मंदिर परिसरात आयोजित करण्यात आली. होती.यामध्ये मुलांनी परिसर भेट देत बांगरवाडी येथील प्रतिपंढरपूर असलेल्या गुप्त विठोबा मंदिर व परिसराची माहिती घेतली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकत्रित वनभोजन करत संगीत खुर्ची, चमचा लिंबू रासदांडिया इत्यादी मनोरंजक खेळांचा आनंद घेतला. शाळेतील उपशिक्षक हरिदास घोडे, कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, योगिता जाधव, प्रवीण नाईकवाडी ,सुषमा गाडेकर, अंजना चौरे यांनी शैक्षणिक परिसर भेटीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. उपशिक्षक संतोष डुकरे यांनी गुप्त विठोबा मंदिरा विषयी मुलांना माहिती सांगितली.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले, उपाध्यक्ष सोहिल बेपारी, सदस्य प्रितम मुंजाळ, वैशाली मटाले, संतोष पाबळे, शेखर पिंगट, शितल गुंजाळ, ग्रामस्थ गौतम पिंगट, स्वप्निल मुलमुले, पंढरीनाथ पाबळे, नारायण खुटाळ, पालक शिला पिंगट, सोनाली पवार, यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून परिसर भेटीमध्ये वनभोजनाचा आनंद घेत सहकार्य केले.शैक्षणिक परिसर भेटीसाठी प्रवासासाठी गाडी व्यवस्था संगीता विजय घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत देण्यात आली. अल्पोपहार उपसरपंच राजेंद्र पिंगट तसेच केळी व पाणी सौजन्य अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले, उपाध्यक्ष व सर्व शालेय व्यवस्थापन समिती यांनी केले.
याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी सर्वांची आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे