विभागीय क्रीडा महोत्सव स्पर्धांमध्ये दिलीप वळसे पाटील कॉलेजचा प्रथमेश थोरवे प्रथम
1 min readनिमगाव सावा दि.६:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे विभागीय केंद्राच्या विभागीय क्रीडा स्पर्धा 4 ऑक्टोबर 2024 रोजी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर पुणे येथेच संपन्न झाल्या. या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये भालाफे, गोळा फेक, लांब उडी, हॉलीबॉल, धावणे यासारख्या 13 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा मध्ये विविध अभ्यास केंद्रातील 85 खेळाडूंनी सहभाग नोंदविला.श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातून या स्पर्धेसाठी प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील प्रथमेश थोरवे या विद्यार्थ्याने शंभर मीटर आणि 200 मीटर धावणे स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांची पुढील केंद्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व केंद्रीय स्पर्धेचे निवड पत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथमेश थोरवे याचे संस्थेचे संस्थापक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे, अभ्यास केंद्र संयोजक प्रा.अनिल पडवळ, प्रा सुभाष घोडे, क्रीडा शिक्षक प्रा. विजय काळे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंदांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यास पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.