आणे बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली
1 min read
आणे दि.४:- बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आणे (ता.जुन्नर) येथील कॅशियर सुशांत राजदेव यांची खातेदारांबरोबर अरेरावीची व उर्मट भाषा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आणे येथील कर्मचारी हे बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहका बरोबर अतिशय उर्मटपणे व अरेरावीची भाषा करत असल्याचे प्रत्येक ग्राहकांच्या निदर्शनास आले आहे. बँकव्यवस्थापनाने कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करून ग्राहकांना योग्य ते न्याय देण्यात यावा. कोणीही ग्राहक बँकेत काही कामा निमित्त गेला असल्यास त्यास उडवाउडवीची उत्तरे देणे त्याच प्रमाणे कोणतीही माहिती व्यवस्थित न सांगणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आहेत.
या शाखेत येणारे सर्व ग्राहक हे शेतकरी व मोलमजुरी करणारे असून त्यांना ताटकळत ठेवणे त्यांना व्यवस्थित माहिती न देणे वेळप्रसंगी त्यांचे खाते बंद करणे असे प्रकार सर्रासपणे होत आहे. तरी बँक व्यवस्थापनाने अशा मुजोर व उद्धट आणि अरेरावीची भाषा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर वेळीच पायबंद घालावा अशी मागणी सोपान बेलकर, अरुण भोसले हरेराम बेलकर यांनी केली आहे.
शाखेत काऊंटर वर दोनच कर्मचारी आहेत. शाखेला ३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. गर्दी वाढल्याने कर्मचाऱ्यांना काम वाढले आहे. कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी चांगल वागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिलीप दानवले, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अधिकारी, आणे