राजुरीत बिबट्या पिंज-यात जेरबंद

1 min read

राजुरी दि.३:- राजुरी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितुनुसार राजुरी (ता.जुन्नर) येथील हातवळन मळ्यात बिबटयाचा पाळीव प्राण्यांवर वाढलेले हल्ल्यांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने आप्पाजी काशिनाथ हाडवळे यांच्या शेतावर पिंजरा लावला होता . मंगळवारी सकाळी भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिज-यात अडकला. घटना स्थळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन अधिकारी त्रिंबक जगताप,स्वप्निल हाडवळे यांनी पकडलेल्या बिबटयाला बिबट निवारण केंद्रात सोडले आहे.

दरम्यान राजुरी हे गाव बिबट क्षेत्रात मोडत असुन या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असुन बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात वनविभागाने या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंज-यांची संख्या वाढवावी अशी मागणी माजी सभापती दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे