प्रसिद्ध गाडामालक मयूर पाटीलबा गाडेकर यांचा आणे गावात मोठ्या थाटामाटात बैलपोळा साजरा
1 min read
आणे दि.३:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बैलपोळ्या निमित्त गावोगावी बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत बैलाला गावातून मिरवण्यात आले. बैलाला सकाळी धुवून व पोळीचा गुळाचा मलिदा प्रसाद म्हणून देण्याची परंपरा जपण्यात आली. बैलांना सजवण्यात हिंगुळ, बेगड, रंग, फुगे, घुंगरमाळ घालून बैल सजवण्यात आली होती.
आणे येथील प्रसिद्ध गाडामालक फायनल सम्राट मयूर पाटीलबा गाडेकर व बैलगाडा संघटना यांचा आने गावात मोठ्या थाटामाटात बैलपोळा साजरा करण्यात आला.