बेल्हे येथे २ दिवसांत दोन बिबटे मृतावस्थेत आढळले
1 min read
बेल्हे दि.३०:- बेल्हे (ता.जुन्नर) गावाच्या शिंदेमळा शिवारात एका शेताच्या बांधावर गवतात शनिवारी दि.२८ व त्यापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर दुसरा बिबट्या रविवार दि.२९ रोजी मृत आढळला. दोन्ही बिबटे अंदाजे चार वर्षे वयाचा नर जातीचे मृत अवस्थेत आढळून आले. शिंदेमळा शिवारात नारायण संताजी शिंदे यांच्या गट क्रमांक २० या शेताच्या बांधावर गवतात शनिवारी सकाळी एक बिबट्या मृत आढळून आला. सामाजिक कार्यकर्ते राकेश शिंदे यांनी ही माहिती तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवली. सकाळी माहिती मिळाल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेऊन बिबट्या ताब्यात घेतला.
वनविभागाच्या बेल्हे वनपाल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर घटनेचा पंचनामा केला. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचे धड विच्छेदनासाठी ताब्यात घेतले. बेल्हे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बेल्हेकर विच्छेदन केले.
तर रविवारी बाजीराव हांडे यांच्या शेतात दुपारच्या दरम्यान त्यांच्या सूनबाई शेतात घास कापण्यासाठी गेले असता बिबट्या मृत आढळून आला.त्यांनी तात्काळ वनविभागाला कळवले.