हाजी गुलामनबी शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश: अल्पसंख्यांक समाजाच्या न्यायासाठी शरद पवार साहेबांच्या प्रेरणेने प्रेरित
1 min read
जुन्नर दि.२९:- शासकीय अधिकारी आणि संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था व उम्मत की खिदमत फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे हाजी गुलामनबी शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शरदचंद्र पवार यांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीने प्रेरित होऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्याच्या आशेने हाजी साहेबांनी पक्ष प्रवेश केला आहे.नगर येथील शिवस्वराज्य मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे, नगर दक्षिण चे खासदार नीलेश लंके,
आणि राष्ट्रवादी युवाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, नगर जिल्ह्याचे निरीक्षक व माजी आमदार अंकुश काकडे, नितेश कराळे सर यांच्या उपस्थितीत हाजी गुलामनबी शेख यांनी पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी माजी आमदार दादा कळमकर, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष साबीर अली सय्यद आणि नगर जिल्ह्यातील विविध पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हाजी साहेबांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जुन्नर व लगतच्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवचैतन्य प्राप्त झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित महिलांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाजी गुलामनबी शेख यांचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले आणि पक्षाच्या यशासाठी एकत्रित काम करण्याची ग्वाही दिली.