बेल्हे जिल्हा परिषद शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
1 min readबेल्हे दि.२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -१ शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी बालसभा घेऊन प्रतिमापूजन करून भाषण करत दोघांचा जीवनपट सांगितला व जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले, उपाध्यक्ष सोईल बेपारी, सदस्य प्रीतम मुंजाळ, संतोष पाबळे व शिक्षणा फाउंडेशनच्या मेंटोर स्वाती शेलार उपस्थित होत्या.
याप्रसंगी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना अभ्यासासाठी सोलर लॅम्पचे वितरण शिक्षणा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी छान भाषणे केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रितम मुंजाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी सर्व सर्वांचे आभार मानले. शाळेचे उपशिक्षक हरिदास घोडे, संतोष डुकरे, कविता सहाने, सुवर्णा गाढवे,प्रविणा नाईकवाडी व योगिता जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.