समर्थ फार्मसीत ७ वी चरक सुश्रुत व्याख्यानमाला संपन्न

1 min read

बेल्हे दि.१:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त चरक शूश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे हे ७ वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प डॉ.राजेंद्र पाटील यांनी जागतिक स्तरावर आरोग्य विषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले.त्यानंतर डॉ.अभिजीत जोंधळे यांनी उद्योजकता विकास व औषध निर्माण शास्त्रातील उद्योजक व्यवसायाच्या संधी या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानमालेबरोबरच आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थीनिर्मित पोस्टर स्पर्धा,त्याचबरोबर लोगो डिझाईन स्पर्धा, वैज्ञानिक रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. आरोग्य सेवा प्रणालीमध्ये फार्मासिस्टची महत्वाची भूमिका आहे आणि फार्मासिस्ट हा आरोग्य व औषध निर्माण शास्त्र यातील महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावरती औषध निर्माण शास्त्रामध्ये भारताने मोठी प्रगती केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर संशोधन कार्य सुरू असल्याचे मान्यवरांनी विशद केले.या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके व समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले हे उपस्थित होते.

या उपक्रमांबरोबरच आळेफाटा या ठिकाणी पथनाट्याचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये प्रामुख्याने विविध औषध प्रकार, उपयोग, गैरवापर व तोटे यावर पथनाट्य व प्रभातफेरी यांचे आयोजन करण्यात आले होते. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सचिन दातखिळे,डॉ.शितल गायकवाड,डॉ.बिपिन गांधी,डॉ.मंगेश होले,प्रा.सुजित तांबे,प्रा.गणेश लामखडे, प्रा.अक्षय फुलसुंदर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक कर्मचारी यांनी नियोजन केले.औषध निर्माण शास्त्र दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांनी शुभेच्छा दिल्या आणि यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे