डॉ.वैभव साठे यांना दंतचिकित्सक पदवी
1 min read
बेल्हे दि.२:- यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. यावेळी बेल्हे (ता.जुन्नर) येथे प्रॅक्टिस करणारे डॉ.वैभव विठ्ठल साठे यांना दंतचिकित्सक ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळस दंत महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच पालक वर्ग उपस्थित होता. डॉ.वैभव साठे यांनी पाच वर्षाच्या या शिक्षणा मध्ये अतिशय कष्ट केले. या कष्टाचेच फळ त्यांना मिळाले आहे. त्यांनी केलेली रुग्णांची सेवा आणि इथून पुढे जी रुग्ण सेवा करतील ती अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांनी मिळवलेली हि दंतचिकित्सक पदवी समाजाच्या उपयोगाला येणार आहे.
बेल्हे व परिसरात उत्तम नेतृत्व करण्याची क्षमता असलेले डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. चांदवड (तालुका चांदवड जिल्हा नाशिक) हे त्यांचे मूळ गाव आहे. समाजातील प्रत्येक घटका पर्यंत त्यांची रुग्ण सेवा पोहचली पाहिजे या साठी त्यांची नेहमी धडपड असते. लहान मुलांचे दंत आरोग्य देखील चांगले असले पाहिजे.
यासाठी त्यांनी वेळोवेळी शाळा बेल्हे जिल्हा परिषद शाळा तसेच पालक, ग्रामस्थ यांच्या समन्वयाने दंत आरोग्य शिबिरासाठी ते पुढाकार घेत असतात. आपल्या कामातून त्यांनी आपला प्रभाव सगळीकडे उमटवला आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असतांना त्यांनी केलेली रुग्ण सेवा भावी डॉक्टरनं साठी अतिशय प्रेरणादायी आहे.
आपल्या पदवीचा उपयोग आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी व्हावा हि त्याची प्रामाणिक इच्छा असते. डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य प्रथम हि त्यांची भूमिका नेह्मीकंग असते. दंत आरोग्य क्षेत्रात आपल्या प्रगतीचा आलेख नेहमी मोठा होत राहो. आपल्या यशाचा आवाज सगळी कडे गुंजत राहो हीच सदिच्छा बेल्हे ग्रामस्थ नारायण पवार यांनी व्यक्त केली.