धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड च्या शाळेत १ ली ते १२ वी पर्यंत मिळणार मोफत शिक्षण; मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश सुरु; पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा
1 min read
बेल्हे दि.३०:- ‘धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजने अंतर्गत माळशेज निकेतन संचालित मॉडर्न इंग्लिश स्कुल बेल्हे (ता. जुन्नर जि. पुणे (सीबीएसई बोर्ड) या शाळेत इयत्ता १ ली ते ५ वी च्या १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेसाठी शासनाची मान्यता असलेली सीबीएसई बोर्डची पुणे जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. या नुसार शासन निर्णया प्रमाणे या
विद्यार्थ्यांना शाळेकडून खालील सुविधांचा मोफत देण्यात येतील १. इयता १ ली ते १२ वी पर्यंतचे मोफत शिक्षण, २. जेवण, राहणे याची मोफत सोय, ३. राहण्यासाठी वसतिगृहात बेड, गादी, बेडशीट, ब्लँकेट शाळेकडून मोफत दिले जाते, ४. दोन वेळचे जेवण, दोन वेळा नाष्टा शाळेकडून मोफत दिला जातो,
५. शालेय गणवेश, नाइट ड्रेस, वह्या, पुस्तके, स्कुल बॅग, शूज या वस्तु मोफत दिल्या जातात, ६. प्रत्येक महिन्याला साबण, तेल, कोलगेट, पेन, पेन्सिल खोडरबर या वस्तु मोफत दिल्या जातात.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -१. विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला किंवा विद्यार्थी शाळेत जात असल्यास बोनफाईड सर्टिफिकेट, २. विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्याच्या वडिलांचा जातीचा दाखला, ३. रेशन कार्ड झेरॉक्स
४. तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, ५. विधवा घटस्फोटीत/ निराधार / भूमिहीन कुटुंबातील विद्यार्थी असल्याचा त्याबाबतचा दाखला / सबळ पुरावा, ६. विद्यार्थी अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र अधिक माहितीसाठी संपर्क:- 9130227558