अभियंता दिना च्या निमित्ताने समर्थ शैक्षणिक संकुलात विविध स्पर्धांचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.३०:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे (ता.जुन्नर) या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त अभियंता दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या शैक्षणिक कलागुणांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी तांत्रिक प्रश्नमंजुषा, पोस्टर सादरीकरण, फोटोग्राफी व फिल्म मेकिंग स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व स्पर्धांमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.इंजिनीयर डे निमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करताना विभाग प्रमुख प्रा.निर्मल कोठारी म्हणाले की डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त हा इंजिनियर्स डे आपण साजरा करत असतो. इंजिनीअर्स म्हणून आपण आपली वेगळी ओळख निर्माण करावी ती ओळख आपल्या कामातून कार्यातून कर्तुत्वाद्वारे सिद्ध करता आली पाहिजे.कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आपण मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी तसेच समाजामध्ये असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी करावा. इंजिनियरिंग शाखा ही मल्टी डिसिप्लिनरी असल्याकारणाने आपण ज्या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत.यावेळी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. स्नेहा शेगर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग प्रमुख प्रा. शुभम शेळके,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.विशाल जोशी,मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.अमोल खतोडे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.अमोल भोर, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा.राजू वाकळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे:-
*प्रश्नमंजुषा स्पर्धा*,*प्रथम क्रमांक*, सिद्धार्थ वाघ,श्रेयस साखरकर,सानिका चाटे *द्वितीय क्रमांक* अपूर्वा पोखरकर,साक्षी भोर,दीक्षा औटी,*ब्रॉडकास्ट युअर सेल्फ स्पर्धा*,*प्रथम क्रमांक*सुरज पवार,*द्वितीय क्रमांक*,साक्षी गोरडे, पूजा जाधव, *फोटोग्राफी स्पर्धा*
*प्रथम क्रमांक*वैष्णवी जाधव,दिव्या निलख,वैष्णवी घायाळ *द्वितीय क्रमांक* प्रतीक बांगर,ऋषिकेश गुंजाळ, आकाश लोणकर,*पोस्टर स्पर्धा*,*प्रथम क्रमांक*
मयूर देशमुख,अंकिता दिवेकर,अक्षय कासार *द्वितीय क्रमांक*पायल निकम,निकिता बागडे सदर स्पर्धेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक व परीक्षक म्हणून टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी काम पाहिले.प्रा.प्रियांका लोखंडे व प्रा.कविता पाटोळे यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुचिता साबळे यांनी प्रास्ताविक प्रा.निर्मल कोठारी यांनी तर आभार पूनम भोर यांनी मानले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे