वडज उपसा सिंचन योजना लवकर चालू करा मिना खोऱ्यातील जनतेला फसवू नका:- ज्ञानेश्वर काचळे
1 min readवडज दि.२५:- नुसते तोंडी मंजुरी आणि निधी मिळून वडज उपसा सिंचन योजना होईल असे भासविले जात आहे. आचार संहिता तोंडावर असूनही प्रकल्प कार्यालयातून काहीच हालचाली होताना दिसत नाही.सर्व्हे चुकीच्या पद्धतीने करून किंवा वेळ लावून गेली अनेक वर्ष प्रकल्प असाच रेंगाळत आहे.2019 पासून मंजुरी च्या गोष्टी ऐकून ऐकून येथील शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. पुन्हा 5 वर्ष असेच चालू राहील आणि वर्षेंनवर्ष हा प्रश्न तसाच चालू राहतो की काय? असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मीना खोऱ्यातील या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी महत्वाची योजना वडज उपसा सिंचन या योजनेसाठी शासनाने ३५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करत प्रकल्पाला मान्यता दिली. अश्या बातम्याही वर्तमानपत्रांना पाहण्यात आल्या. या योजनेच्या माध्यमातून सावरगाव, खिलारवाडी, निमदरी, धोंडकरवाडी, एकनाथवाडी, काचळवाडी, पाबळवाडी, निळोबाराय नगर यांसह इतर वाड्या वस्त्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र हा फक्त वेळ घालवण्याचा खेळ आहे. सरकार फक्त फसवत आहे.
यासाठी 1991 पासून आम्ही आंदोलन करत आहोत. मागील वर्षी 30 जुलै 2023 ला मोठ्या संख्येने महिला भगीनी, तरुण वर्ग व शेतकरी सतत अगदी भर पावसात उपोषणासाठी तहसील कचेरी समोर बसले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट ला जलसमाधी घेण्यापर्यंत विषय गेला. मात्र वर्षा मागून वर्ष गेली मात्र आमच्या नशिबी फक्त घोषणाच आल्या. प्रत्यक्षात काहीच झाले नाही आणि होईल असे वाटत नाही तरी वडज उपसा सिंचन योजनेची प्रत्यक्ष निविदा काढून आचारसंहिता लागायच्या अगोदर योजना चालू व्हावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर (माऊली) काचळे यांनी केली आहे. अन्यथा मोठा उद्रेक होईल व जलसंपदा च्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील.
प्रतिक्रिया
आम्ही शेतकरी पाण्यावाचून मेलो तरी सरकारला काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे सरकार फक्त निवडणुकीसाठी जनतेला खोटे फसवत आहे. वडज उपसा सिंचन योजना मंजुरी हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर गाजर आहे.
ज्ञानेश्वर (माऊली) काचळे
कार्यकर्ते: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे