गुळुंचवाडी येथील गणेश पाझर तलाव १०० टक्के भरला; शेतकऱ्यांनी केले जलपूजन
1 min read
बेल्हे दि.२६ :- या आठवड्यात तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने गुळुंचवाडी येथील गणेश पाझर तलाव १०० टक्के भरला असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून जलपूजन केले.
गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील सर्व ग्रामस्थांना शेतीसाठी बोअरवेल आणि विहिरींना गणेश पाझर तलाव पाण्याचा मोठा स्रोत आहे.
तलावात पाणी आहे तोपर्यंत शेतकरी वर्गाला मुबलक प्रमाणात पाणी शेतीसाठी उपलब्ध होत असते. गेल्या दोन वर्षात हा तलाव भरला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्गापुढे दुष्काळाचे संकट ओढावले होते.
शेतकऱ्यांच्या बोअरवेल व विहिरींनी तळ घाटला होता. त्यामुळे कोणताही शेतमाल शेतकऱ्यांना घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. गेली महिनाभर या भागात पाऊस नव्हता.
उन्हाचा तडाखा वाढला होता. त्यामुळे या भागतील पिके करपू लागली होती. परतीच्या पावसाने हा तलाव पूर्णपणे भरल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तलाव भरल्यावर रभाजी कर्डिले, राजेश भांबेरे, बाजीराव भांबेरे, विठ्ठल खिलारी, सुखदेव बांगर, अनिल बांगर, प्रशांत कर्डिले, रोहन घोडके, विशाल भांबेरे या शेतकऱ्यांनी एकत्र येत पाणी पूजन करून समाधान व्यक्त केले.