गणेश सहकारी दूध संस्थेच्या गवळ्यांना १०० टक्के अनुदान:- चेअरमन बाळासाहेब हाडवळे

1 min read

बेल्हे दि.२५:- पुणे जिल्ह्यातील नावाजलेली दूध संस्था गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या, राजुरी (ता.जुन्नर) या संस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात चेअरमन बाळासाहेब हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

शासनाने मंजूर केलेले शेतकरी दूध प्रति लिटर ५ रुपये अनुदान राजुरी डेअरी च्या १०० टक्के गवळ्यांना देण्यात संस्थेला यश आलेले आहे. त्यामुळं सर्वामध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती संस्था चेअरमन बाळासाहेब हाडवळे यांनी बोलताना दिली.यावेळी विषयपत्रिकेतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. संस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, संस्था व्हा. चेअरमन लक्ष्मण घंगाळे,माजी चेअरमन गोपाळा औटी, सुभाष पा. औटी, सोपान कदम, अनंत गटकळ, संस्था संचालक मंडळ, ग्राहक पंचायत अध्यक्ष बाळासाहेब औटी,

शरद चंद्र पतसंस्था चेअरमन एम.डी. घंगाळे, जी.के औटी, विघ्नहर साखर कारखाना संचालक पप्पू हाडवळे, वल्लभ शेळके, अविनाश पा. औटी, एकनाथ शिंदे, मुरलीधर औटी, निलेश हाडवळे, गोरक्ष हाडवळे, संस्था सभासद, सचिव, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेला मार्गदर्शन दिपक औटी, प्रिया हाडवळे, वल्लभ शेळके यांनी केले व अहवाल वाचन संस्था सचिव निवृत्ती हाडवळे यांनी केले, आभार किरण औटी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे