सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम
1 min read
राजुरी दि.२४:- सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी (ता.जुन्नर) येथे अटल ए.आय.सी.टी.इ. मान्यता प्राप्त सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम दिनांक २३ सप्टेंबर २०२४ ते २८ सप्टेंबर २०२४ पासून क्लाउड कॉम्प्युटिंग आणि क्लाउड तंत्रज्ञानासह उदयोन्मुख ट्रेंडच्या मूलभूत गोष्टींवर एक आठवड्याचा विद्याशाखा विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. श्रीनिवास सोनकर यांच्या हस्ते झाले. क्लाउड कॉम्प्युटिंग क्लाउड टूलचा परिचय AWS क्लाउड कॉम्प्युटिंग टर्मिनोलॉजी, क्लाउड कॉम्प्युटिंग डिप्लॉयमेंट मॉडेलचे प्रकार, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवांचे प्रकार आणि क्लाउड ऍप्लिकेशनवरील विविध डेटा स्टोरेज पद्धती आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमधील क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये
जोखीम व्यवस्थापन व्हर्च्युअलायझेशन संकल्पना क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये वर्च्युअलायझेशनची अंमलबजावणी आणि क्लाउड कॉम्प्युटिंग केस स्टडीमध्ये व्हर्च्युअलायझेशन नवीनतम ट्रेंड किंवा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकावर उहापोह होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महाविद्यालयाचे चेअरमन व्ही. आर. दिवाकरण, संचालक किशोरभाई पटेल, सचिन चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य पी.बलराम तसेच परिसरातील महाविद्यालयातील प्रा. प्रतिनिधी सर्व विभाग प्रमुख
शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन कॉम्प्युटर विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक कविता खटाळ आणि प्राध्यापक तेजस नलावडे यांनी केले.