व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत नेत्रदिपक यश
1 min read
नगदवाडी दि.२२:- येथील व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत नेत्रदिपक यश मिळवले आहे. दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी मुलांचा १४ व १७ वर्ष वयोगट तर दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी मुलींचा १४ व १७ वर्ष वयोगट तालुका, शिरूर या ठिकाणी जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.सदर विद्यार्थांनी जिल्हास्तरीय नेमबाजी (ओपन साईड) स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने शाळेचे व जुन्नर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.ज्ञानेश्वरी प्रविण पटाडे (इयत्ता ८वी) हिने १४ वर्षाखालील गटातील नेमबाजी (ओपन साईड) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
तर वेदिका विलास अभंग (इयत्ता ८ वी) हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. इशिता किशोर काकडे (इयत्ता १०वी) हिने १७ वर्षाखालील गटात नेमबाजी (ओपन साईड) स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे.तसेच निखिल सतीश भोर (इयत्ता १०वी) याने देखील जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.
असून त्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे सर्व विश्वस्त, संस्थेचे सीईओ दुष्यंत गायकवाड, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे व इतर सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक तसेच प्रशिक्षक किशोर काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.