राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॉलेजला NAAC-B नामांकन प्राप्त

1 min read

कर्जुले हर्या दि.२२:- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या कॉलेजला देशात व शैक्षणिक विभागात मानाचे समजले जाणारे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांस कडून (NAAC) कडून यशस्वीरित्या ‘बी’ दर्जाचे मानांकन मिळाले असून. या मानांकनमुळे कॉलेजच्या शैक्षणिक व गुणवत्तेचा दर्जा वाढेल आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी मिळणार आहे.सदर NAAC मान्यतेसाठी कॉलेजने चालविलेल्या दर्जेदार शिक्षण, संशोधन व विद्यार्थांना दिल्या जाणाऱ्या इतर आवश्यक सुविधांच्या बाबतीत उत्कृष्टता साधली आहे. याबाबत कॉलेजच्या व्यवस्थापनाने या यशाबद्दल आनंद व्यक्त करत, संस्थेच्या विकासासाठी व गुणवत्ता वाढवण्यासाठी नवंनवीन योजनांची घोषणा सुरू केलेली आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असून आणि शैक्षणिक क्षेत्रात कॉलेजची प्रतिष्ठा आणखी उंचावली आहे. याबाबत मेहनत घेतलेल्या प्राचार्य डॉ. अमोल लोखंडे, उपप्राचार्य आणि आय क्यू एस सी इन्चार्ज डॉ.कृपाल पवार,सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेच्या वतीने सचिव किरण आहेर, कार्यअध्यक्ष डॉ .दीपक आहेर यांनी खास अभिनंदन करून पुढील वाटचलीसाठी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे