समर्थ संकुलात नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राचे उद्घाटन
1 min read
बेल्हे दि.२१:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल येथे नुकतेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता दिघा विभागामार्फत या विकास केंद्राचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे करण्यात आले.
किसान गॅस क्लीन एनर्जी टेक सोल्युशन प्रा. लि. चे मॅनेजर प्रमोद खोसे, कॉर्पोरेट ट्रेनर अभिजित सावेकर, गेट ट्यूटर चे अधिकारी मल्लिकार्जुन बोरीगिड्डे आदी मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा. या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून महाविद्यालयातील व महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये कौशल्य अधिष्ठित प्रशिक्षित घेण्याची संधी प्राप्त होणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.यावेळी मोफत कौशल्य शिक्षण व नोकरी या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधत.
विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याचा मानस संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी व्यक्त केला.विद्यार्थ्यांना सोलर पंप टेक्निशियन व सोलर पी व्ही इन्स्टॉलर (सूर्य मित्र) या दोन क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
कुशल रोजगारक्षम महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पदविका पुरेशी नसून त्यांच्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे. या कौशल्याच्या जोरावर ते उत्तम करिअर घडू शकतात अशी माहिती समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांनी दिली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे, प्रा संकेत विघे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत.
अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. सतीश गुजर,समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मानले.