जुन्नरची जागा उबाठा गटाला मिळाल्यास विलास वाव्हळ यांची वर्णी लागणार

1 min read

मुंबई दि.२३:- जुन्नर विधानसभेची जागा उबाठा गटाला मिळाल्यास संजय राऊत यांचे निकटवर्ती विलास वाव्हळ यांना मिळणार असल्याची चर्चा संजय राऊत व विलास वाव्हळ यांच्या सोमवार दि. २३ रोजी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत झाली. अशी माहिती विलास वाव्हळ यांनी दिली. पुढच्या आठ दिवसांमध्ये जुन्नरच्या जागेचे चित्र स्पष्ट होणार असून वाव्हळ यांना तयारीला लागण्याची सूचना राऊत यांनी दिले आहेत. संजय राऊत यांच्या सूचनेनुसार वाव्हळ यांनी जुन्नर तालुक्यात मतदारांच्या गाठीभेटी व गुप्त बैठका घेऊन जोरदार तयारी सुरू केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी वाव्हळ यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या बैठकीपासून विधानसभेच्या तयारीला वाव्हळ लागले आहे. जुन्नर तालुक्यातील तेली व ओबीसी समाज वाव्हळ यांच्या पाठीशी असून कार्यकर्त्यांनी वाव्हळ यांचा प्रचार सुरू केला आहे. जुन्नर तालुक्यातील बिबट्याची समस्या, दिवसा विजेची समस्या, रस्त्याच्या समस्या आजी-माजी आमदारांनी याकडे दुर्लक्ष केले असून प्रथम प्राधान्य या समस्येकडे दिले जाणार असल्याचे वाव्हळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वाव्हळ यांच्या पत्नी दलित समाज्यातील असून त्या मूळे पुरोगामी विचार करणाऱ्या विलास वाव्हळ यांना दलित, अनुसूचित जाती व जमाती यांचे सुद्धा एक गाठ्ठा मते मिळतील. त्याच प्रमाणे ते स्वतः ओबीसी सामाज्याचे असल्याने संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे